अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : समाजप्रबोधनकार म्हणून लोकप्रिय असणाऱ्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात पीसीपीएनडिटी अंतर्गत इंदुरीकर महारांज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनतर ”संगमनेरच्या न्यायालयात दाखल झालेला खटला हा सत्याचा विजय आहे. उशिरा का होईना हे सत्याचा विजय झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.
केवळ राजकीय दबावापोटी व काही व्यक्तींमुळं इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी या प्रकरणाला वारकरी संप्रदायाशी जोडलं गेलं.
हिंदुत्वाशी जोडलं गेलं. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या संघटनांची बदनामी केली गेली. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला,’ असं देसाई म्हणाल्या.
‘आता कोर्टात सुनावणी होईल. इंदोरीकरांची चौकशी होईल आणि लवकरच सत्य समोर येईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews