अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एक वय १८ ही विद्यार्थिनी तसेच तिचा भाऊ या दोघांना चौधा जणांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून जखमी केले.
तसेच विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. जखमीवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विद्यार्थिनीने श्रीरामपूर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी किरण रामदास लष्करे , पवन उपळकर , विशाल धनवटे , विशाल गुंजाळ व इतर २० ते ३० लोक सर्व रा . नाऊर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नाऊरसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.