महाराष्ट्र

Atmarao Sonawane : महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत माणूस आहे शेतमजूर, लाखोंची देणगी, विद्यार्थ्यांना जेवण आणि बरच काही..

Published by
Ahmednagarlive24 Office

Atmarao Sonawane : मनाचा मोठीपणा असला की माणूस एक नंबर अस आपल्याकडे म्हटले जाते. आता महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत माणूस हा मनुष्य शेतमजूर आहे. पत्नीसह इतरांच्या शेतात काम करून वर्षभर पैसे जमा करतात. त्या पैशातून त्यांनी गावातल्या सरकारी शाळेला एक लाख रुपये देणगी दिली आहे.

यामुळे त्यांची चर्चा सुरू असते. त्याच्या आधीच्या वर्षी 35 हजाराची विद्युत उपकरणे बसवून दिली आहेत. तर, मागील सात वर्षे आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृती निमित्त 600 विद्यार्थ्यांना जेवण देतात. गावात वाचनालय चालवतात. तसेच अनेकांना मदत करत असतात.

यामुळे ही व्यक्ती सतत चर्चेत असते. महाराष्ट्रातील या श्रीमंत व्यक्तीचे नाव आत्माराव सोनवणे असे असून ते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या खामसवाडी गावात राहतात. काही माणसं अमाप संपत्तीमधून काही वेळेस समाजातील काही उपक्रमांना देणगी देतात.

महाराष्ट्रात असे हजारो श्रीमंत आहेत. मात्र, या सगळ्यांपेक्षा हा वेगळा श्रीमंत माणूस समोर आला आहे. तो देखील शेतमजूर आहे. रानात ते शेतमजुरी करतात. आत्मराम सोनवणे हे खामसवाडी गावात पत्र्याच्या तीन खोलीत राहतात. त्यांच्याकडे एक गुंठा जमीन देखील नाही. मात्र ते मनाने खूपच मोठे आहेत.

त्यांच्याकडे शासकीय नोकरी देखील नाही. मात्र, त्यांच्या श्रीमंतीचा महिमा मोठा आहे. सोनवणे यांनी शेतात काम करून जमा केलेल्या एक लाख एक हजार रुपयांमधून इयत्ता दहावीसाठी 40 बाकडे बनवण्याते काम सुरू आहे. अशी किती तरी मोठी मदत त्यांनी अनेकदा केली आहे.

Ahmednagarlive24 Office