आदिवासी मुलीवर अत्याचार; आरपीआयच्यावतीने ‘हे’ निवेदन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- समाजात आज विविध घटना घडतात की ज्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या असतात. अनेक घटनांनी शहरे हादरून जातात. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असतात.

महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावात घडली होती.

भूत बंगला परिसरातील वस्तीत आदिवासी मुलीवर अत्याचार करून बेशुद्ध अवस्थेत खून करण्यात आला होता. त्यामुळे या नराधमास तसेच रावेर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन एकाच कुटुंबातील चार भावंडांचा खून झाला. या प्रकरणाचा तातडीने तपास लावून कठोर शासन व्हावे, अशी मागणी आरपीआयच्यावतीने करण्यात अली असून

तसे निवेदन लोणी पोलीस स्टेशनला देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, या दोन्ही घटना खांदेशातील आहेत. तरी अशा नराधमांस जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे.

जेणेकरून भविष्यात असे अत्याचार करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. तरी सदर घटनांचे गांभीर्य लक्षात घेता अनुसूचित विरूद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर शासन व्हावे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24