अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जळगाव : जिल्हा कारागृहात पुर्व वैमन्यास्यतून कैद्यांमध्ये वाद होत तिघांनी एकावर प्राणघाताक हल्ला केल्याची घटना दि. १५ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.
हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे जिल्हा कारागृह प्रशासनाची अब्रु वेशीला टांगली गेली असून अधिकाऱ्यांचा कौद्यांवरचा वचक राहिलाच नसल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.
अमळनेर येथील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून शिवम मनोज देशमुख (वय २०, रा. अमळनेर) हा जिल्हा कारागृहात बंदी आहे.