तुरुंगात कैद्याचा औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- राहुरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात कैद असलेल्या कोल्हार खुर्द कैदी असलेला अल्लाउद्दीन शेख (वय ३०) याने पायाला लावायचा मलम खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री केला.

त्याला लगेच राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी या घटनेला दुजोरा दिला. मात्र, पोलिस प्रशासनाने या बाबतीत गुप्तता पाळली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका आरोपीने पोटात चमचा मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता मलम प्राशन केल्याने पोलिसांची चांगलीच पळापळ झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24