अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील कुकडी नदीपात्रात निघोजच्या कुंड परिसरात आढळून आलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध अदयाप लागलेला नाही. 

पारनेर पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या नेतृत्चाखालील पथकाने पुणे जिल्हयात विविध ठिकाणी भेटी देउन तेथून कोणी बेपत्ता झाले आहे का ?

तेथे मृतदेहाशी सबंधित काही पुरावे मिळतात का ? याची कसून चौकशी केली परंतू अदयाप तरी पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही. एकदा मृतदेहाची ओळख पटल्यावर आरोपींचा शोध घेणे सोपे जाईल असे पोलिसांचे मत आहे.

धान्य ठेवण्याच्या कोठीमध्ये कोंबलेल्या अवस्थेतील मृतदेह कुकडी नदीपात्रात आढळून आल्यानंतर निघोज परिसरात एकच खळबळ उडाली होती. सहा. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मृतदेह असलेली कोठी नदीबाहेर काढली.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर कमरेच्या बेल्टने गळा आवळून त्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचे निश्पन्न झाले होते. हा मृतदेह नदीपात्रातून वाहत आल्याची चर्चा होती.

परंतू पुणे जिल्हयातील टाकळी हाजीला जोडणा-या जुन्या पुलाजवळ आढळून आलेला हा मृतदेह पाण्यासोबत वाहत आला नसावा तर तो तेथे कोणीतरी आणून टाकला असल्याच्या मुददयावर पोलिसांचे एकमत झाले आहे. त्यामुळे या परिसरात कोण येउन गेले याचाही शोध पोलिस प्रशासनाकडून घेतला जात आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24