सावधान नगरकरानो ! पहा काय होतय कोरोना रुग्णासोबत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपलब्ध नसताना देखील ते कोरोना रुग्णांना दिले जात असल्याचे प्रकार घडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांनी हा प्रकार सांगितला आहे.

जिल्हा रुग्णालयासह खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठी रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरते. परंतु जिल्ह्यात हे औषध उपलब्ध नसल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनावरून स्पष्ट झाले.

या औषधाबाबत अधिक माहिती घेतल्यावर गेल्या काही दिवसांपासून हे औषध उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली. तरी देखील रुग्णांना हे औषध दिले जात असल्याचे काही खाजगी रुग्णालयांकडून सांगितले जाते.

तसे बिले देखील काढली जात आहेत. या प्रकाराचा एक अनुभव अहमदनगर शहरातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी सांगितला. त्यांच्या नातेवाईक रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हा रुग्ण काही तासच होता.

या कालावधीत रुग्णालयाकडून रुग्णाला दोन इंजेक्शन देण्यात आली. परंतु कार्यकर्ते बिलाची चौकशी केली. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाकडे तक्रार केली.

रुग्णालयात असलेल्या औषधालयातील औषधांची माहिती घेतली. त्यात रेमडेसिवीर औषधच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली. त्यावरून या कार्यकर्त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना बिल भरताना योग्य ती चौकशी करावी,

अशी विनंती केली आहे. काही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24