उच्चभ्रू वसाहतीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

औरंगाबाद : बीड बायपासवरील एकाच उच्चभ्रू वसाहतीमध्ये काही मीटर अंतरावरच दोन बंगल्यांमध्ये दोन हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री समोर आला.

गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी दोन्ही ठिकाणी डमी ग्राहकाच्या मदतीने छापा टाकल्यानंतर या परराज्यातील तरुणींचा सहभाग असलेल्या उच्चभ्रू रॅकेटचा पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेेने शनिवारी तब्बल सहा तास ही कारवाई केली.

संजय त्र्यंबक कापसे, (४४, रा. गणेशनगर, गारखेडा परिसर) व विनोद टेकचंद नागवणे, (३५, रा. सिडको एन-४) यांच्यासह दोन महिला दलाल तेथे सापडल्या.

रॅकेटमध्ये ग्राहक म्हणून गेलेल्यामध्ये एका मॉलचे प्रमुख मोहंमद अर्शद साजिद अली (४९, रा. एमआयडीसी, चिकलठाणा) अजय सुभाष साळवे, (२३, रा. आनंदनगर, भारतनगर), ज्ञानेश्वर सर्जेराव जऱ्हाड (४२, रा. रेल्वेस्टेशन रोड, बदनापूर) आणि अमोल दाम शेजूळ (२९, रा. म्हाडा कॉलनी, मुकुंदवाडी) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

कापसे हा राजेशनगरमध्ये, तर नागवणे यशवंतनगरमध्ये रॅकेट सांभाळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी तीन वाजता दोन वेगवेगळ्या पथकांनी डमी ग्राहकाच्या मदतीने दोन्ही ठिकाणी धाड टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला.

राजेशनगरमध्ये तीन तरुणी व यशवंतनगरमध्ये एक तरुणी आढळून आली. धाडीमध्ये कंडोमची सुमारे शंभर पाकिटे, दारू व दलाल महिलेकडे ५० हजार रोख रक्कम सापडली. पुंडलिकनगर ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24