भयानक ! जसा माणसांना कोरोना तसा जनावरांना पछाडतोय ‘हा’ आजार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- गेल्या फेब्रुवारी व मार्चपासून कोरोनाने भारताला ग्रासलं आहे. महाराष्ट्रातही ही आकडेवारी मोठी आहे. परंतु या आजाराबरोबरच जनावरांमध्येही साथीचा आजार आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. दोन्ही आजारांमध्ये मृत्यूचे प्रमाण फारच कमी असले तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

काय आहे हा आजार :- लंपी स्किन डिसीज हा प्रमुख्याने गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणार्‍या देवीच्या या वर्षी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंश पेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा आजार नवीन नाही २०१९ मध्ये भारताच्या हा रोग यापूर्वी आढळून आला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात आहे हा रोग आता हळूहळू पाय पसरवत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग व पशु व्यावसायिकांना या नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे.

काय आहेत या लंपी स्किन आजाराची लक्षणे :- .यामध्ये जनावरे अशक्त होतात. हा विषाणूजन्य आजार आहे. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीला जनावरास दोन-तीन दिवस ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी ४ ते ५ दिवसात फुटतात आणि त्यातून पस बाहेर येते. या गाठी सर्वसाधारणपणे पोट, पाठ पाय व जननेंद्रियाच्या भागात येतात. जनावरांच्या डोळ्यातून नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाता येत नाही. पायावरील गाठीमुळे जनावरे चालणे कठीण होते. डोळ्यामध्ये व्रण पडतात व कालांतराने दृष्टी बाधित होण्याची शक्यता असते. न्यूमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. अशक्तपणामुळे जनावरांचा या आजारातून बरे होण्यास बऱ्याच दिवसांचा कालावधी लागतो. हा आजार बरा होण्यासाठी किमान दोन तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.

 नेवाशात काय परिस्थिती ? :- तालुक्‍यातील 127 गावांतील 1 लाख 32 हजार 132 गाय वर्ग व म्हैस वर्ग गटातील जनावरांपैकी 33 गावांतील 252 जनावरांना “लम्पी स्किन’ (त्वचारोग) आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशूपालकांत मोठी घबराट पसरली आहे. पशूसंवर्धन विभागाने तत्काळ लसीकरण मोहीम हाती घेत, आजपर्यंत 25 हजार 19 जनावरांना लसीकरण केले आहे. तालुक्‍यातील 33 गावांमध्ये 23 हजार 179 गाय वर्ग, तर म्हैस वर्ग गटात 5 हजार 36, अशी एकूण 28 हजार 215 जनावरे आहेत. त्यापैकी मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या “लम्पी स्किन’ साथरोगाने तालुक्‍यातील 33 गावांतील 252 जनावरे बाधित झाली होती. त्यात 250 गाय वर्ग, तर 2 म्हैस वर्ग गटातील जनावरांचा समावेश आहे.

असा होतो प्रसार:- “लम्पी स्कीन’ हा विषाणूजन्य त्वचारोग असून, तो साथीचा आजार आहे. या आजारामुळे जनावरांच्या अंगावर 2 ते 5 सेमी आकाराच्या गाठी येतात. पायावर सूज येते. डोळे व नाकातून रक्तस्त्राव होतो. दूधउत्पादनात मोठी घट होते. जनावरांत गर्भपात होणे किंवा रोगग्रस्त वासरांत जन्मजातच या रोगांची लक्षणे दिसून येतात. माशा, डास, गोचिड, चिलटे यापासून या रोगाचा प्रसार होतो. बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष स्पर्शाने, दूध पिणाऱ्या वासरांना बाधित गायीच्या दुधातून, बाधित वळूच्या नैसर्गिक संयोगातून निरोगी गाय, म्हशींना हा आजार होतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24