Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच जूनला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र, आजारपणामुळे त्यांना तो रद्द करावा लागला.
त्यापूर्वीच पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांनी १० जूनला अयोध्या दौरा जाहीर केला होता. मात्र, त्याच दिवशी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यांनाही तो पुढे ढकलावा लागत आहे.राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यातून बरे झाल्यानंतरच त्यांचा अयोध्या दौरा होईल.
त्याची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तर आदित्य ठाकरे आता १५ जूना अयोध्येत जाणार आहेत. आदित्य ठाकरे रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयु किनारी आरती करणार आहे.
या दौऱ्याच्या नियोजनासाठी प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह काही नेते आजच अयोध्येला गेले आहेत. मनसेचे ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याने ठरला दिवस चुकवायला नको म्हणून त्यांचे ठाण्यातील कार्यकर्तेही अयोध्येला गेले.