वृत्तसंस्था :- योगगुरू बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात गदारोळ सुरू झाला.
बाबा रामदेव यांनी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी संबोधलं होतं. त्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत बाबा रामदेव यांना इशारा दिला आहे.
‘बाबा रामदेव यांनी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी संबोधित करणे अत्यंत चुकीचं असून हे अजिबात खपवून घेणार नाही.
रामदेव बाबांनी लवकरात लवकर माफी मागितली नाहीतर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
दरम्यान रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीविरोधात सोशल मीडियावर धुमाकूळ सुरु असून पतंजलीच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन करणारे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.