अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच जिल्ह्याचं पालकमंत्री स्वीकारण्याबाबत नकार दिल्याचं समोर आलं आहे. खातेवाटपाबाबत आजही मंत्रिमंडळाची चर्चा झाली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. मी खूप सिनिअर आहे. जिल्ह्यात अनेक आमदार आणि मंत्री आहे.
त्यांना संधी दिली पाहिजे. मी नगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद जरी स्वीकारलं नाही तरी पालक आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.
तसंच, काळाच्या ओघामध्ये राजकारणाला थोडा वेग आला आहे. तिन्ही पक्ष मिळून एकत्र आले आहे. त्यामुळे जागा कमी आहे. त्यामुळे काही इच्छुकांना मंत्रिपद देऊ शकलो नाही, हे वास्तव आहे.
नाराज नेत्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे, असं आवाहनही थोरात यांनी केलं. भाजप नेत्यांची अवस्था बिकट आहे.
सत्ता न मिळाल्याने पाण्याबाहेर मासा कसा तडफड करत असतो तशी अवस्था विरोधकांची झाली आहे, असा टोलाही थोरात यांनी भाजपला लगावला.