अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- नगर जिल्ह्यातील दोन प्रतिष्टीत राजकारणी थोरात आणि विखे पाटील यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक हल्ले सुरु झाले आहेत.
यावेळी निमित्त आहे विखे पाटील परिवाराची भाजपातून पुन्हा कॉंग्रेसमध्ये होणारी घरवापसी अर्थात याबद्दल राधाकृष्ण विखे यांनी ह्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितलेय.
मात्र हे जाहीर करतानाच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट हल्लाही चढविला आहे
बाळासाहेब थोरात हे दोन वर्षाआधी भाजपमध्ये येण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माझ्या पक्षप्रवेशाची चिंता करू नये असंही विखे पाटील म्हणालेत. राजकीय फायद्यासाठी थोरातांनी पक्षाची फरप़ड केली आणि पक्ष दावणीला बांधला.
भाजपमध्ये येण्यासाठी ते कोणत्या नेत्यांना भेटले हे मला सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात विखेंनी थोरात यांच्यावर घणाघाणी टीका केली आहे.
दरम्यान विखे पाटील यांच्या ह्या वक्तव्यानंतर दोन वर्षापूर्वी बाळासाहेब थोरात कोणत्या नेत्यांना भेटले यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.