संगमनेर :- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली.
देशात व महाराष्ट्रात सध्या लोकसभेची धाम धूम सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातील व महाराष्ट्रातील दिग्गज नेते प्रचारात सहभागी होणार आहेत.
यामध्ये सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष खा.राहूल गांधी, सरचिटणीस पियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांसह आ.बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिकपणामुळे त्यांची काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या अशा राष्ट्रीय वर्किंग कमिटीत कायमस्वरुपी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागातील सर्व प्रश्नांची जाण व सामान्य नागरिकांशी थेट संवाद यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीतील प्रचाराच्या रणधुमाळीत थोरात हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असणार आहे.