अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- आगामी निवडणुका पक्ष संपूर्ण ताकदीने लढवेल. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी काँग्रेसला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार होईल,
अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, अनुराधा नागवडे यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रत्येक तालुकानिहाय आढावा बैठक शनिवारी संगमनेर येथे घेतली.
कोपरगाव तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, निवडणूक रणनीती, पदाधिकारी विस्तार, वर्षभरातील कार्यक्रम या बाबींवर यावेळी चर्चा झाली. तालुक्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून लोकांपर्यंत प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता पोहोचला पाहिजे.
आगामी निवडणुका पक्ष संपूर्ण ताकदीने लढवेल. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी काँग्रेसला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार होईल, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे थोरात यांनी सांगितले.