अहमदनगर: राजकारणात कधी कुणाचे अच्छे दिन येतील आणि कधी कुणाची सत्ता जाईल हे सांगता येत नाही. याचाच अनुभव आता महाराष्ट्र घेतोय.
फडणवीस यांनी आरशासमोर उभं राहावं त्यांना पुढचा विरोधीपक्ष नेता दिसेल अशी भविष्यवाणी दोन महिन्यापूर्वी थोरातांनी केली होती. देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षात दिसत आहेत. असे ही थोरात म्हणाले होते.
गेल्या महिन्याभरात राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष जनतेनं पहिला. सत्तेच्या राजकारणात अनेक ट्विस्ट आल्यानंतर अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत बसली आहे.
तर भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आणि त्यांचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.
थोरात यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीया वर थैमान घालत आहे.