अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत नेते बाळासाहेब विखे (पाटील) लिखित ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.
या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले कि, दिवंगत नेते बाळासाहेब विखे (पाटील), नेहमी तत्त्वाने वागले. त्यांनी सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही.
तसेच परिणामांचा विचार न करता, तत्त्वाशी एकनिष्ठ राहिले. राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब विखे पाटलांच्या राजकीय तसेच सामाजिक प्रवासावर प्रकाश टाकला.
सहकाराचं रोपटं बाळासाहेबांनीच लावलं असून, त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केल्याचं सांगितलं. ‘महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं बाळासाहेब विखेंचं स्वप्न होतं.
यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचं हेच स्वप्न युती सरकारने पुढे नेलं तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले की, ‘बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे,
ही आनंदाची गोष्ट आहे. देशाच्या खंबीर नेतृत्वाच्या हस्ते प्रकाशन, हा बाळासाहेब विखे यांचा गौरवच आहे, असे म्हणावे लागेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved