अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्ववभूमीवर महसूलमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीची अपेक्षा केली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत.
या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत,
अशी माहिती काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महसूलमंत्री थोरात पुढे म्हणाले की,केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे.
आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील असेही थोरात म्हणाले.
राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved