पांढऱ्या सोन्याच्या आगरात बळीराजाची व्यापाऱ्यांकडून होतेय फसवणूक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- आधीच गेले सहा महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोनाच्या संकटामुळे हतबल झालेला बळीराजा या संकटातून सावरतो तोच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते.

एकीकडे परिस्थिती पुर्वव्रत होत असताना आता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडत आहे.

शेवगाव तालुक्‍यात सर्वाधिक कपाशीलागवड होते. तालुका पांढऱ्या सोन्याचे आगार म्हणून ओळखला जातो. यंदा घण्यास सुरवात झाली असली, तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.

त्यामुळे शेतात वेचणीस आलेला कापूस भिजला. व पांढऱ्या शुभ्र कापसाचा रंग बदलला. वेचलेला कापूस वाळवून विक्रीसाठी नेला, तरी व्यापारी भिजलेला कापूस म्हणून भाव पाडून मागतात.

शासनाचा हमी भाव 5500 रुपये क्विंटल असताना, अवघ्या दोन-तीन हजार रुपये क्विंटलने कापूस घेतला जातो. त्यातून पिकावर झालेला खर्च, केलेली मेहनतही निघत नाही.

मात्र, सणासुदीच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही. कवडीमोलाने कापूस देणे शेतकऱ्यांना भाग पडत आहे. शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तालुक्‍यात सुरू नसल्याने व्यापाऱ्यांनी त्याचा फायदा उठवला आहे.

तालुक्‍यातील सर्व छोट्या-मोठ्या गावांत, रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी खरेदी केंद्रे थाटली आहेत. तेथे कापूस खरेदी करून तो वाहनांतून परराज्यांत पाठविला जात आहे.

आर्थिक संकटाना तोड देणाऱ्या बळीराजाची यंदाच्या वर्षीही खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24