Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Bank New information : तुमचे ATM कार्ड कोणत्या प्रकारचे आहे? डेबिट आणि क्रेडिट कार्डचेही आहेत अनेक प्रकार; एकदा जाणून घ्याच…

व्यवहार किंवा पैसे काढण्यासाठी सर्वजण ATM कार्डचा वापर करत असतात. यामुळे बँकेत न जात तुम्ही सहज जवळच्या ATM मध्ये जाणून पैसे काढू शकता.

Bank New information : जर तुम्ही ATM कार्ड वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही जे ATM कार्ड वापरता त्याचे अनेक प्रकार आहेत जे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही बँकेकडून डेबिट आणि क्रेडिट कार्ड घेत असता. मात्र त्यावेळी तुम्ही जे कार्ड घेत आहे ते कोणत्या प्रकारचे आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. कारण त्या कार्डचेही बरेच प्रकार आपल्याला पहायला मिळतात. बँक आणि आपल्या उत्पन्ननुसार आवश्यकतेप्रमाणे आपण योग्य ते कार्ड निवडू शकतो. आपल्याला अशा कार्डचे प्रकार माहिती आहेत का?

1. क्लासिक कार्ड-

क्लासिक कार्ड हे एक अतिशय मूलभूत कार्ड आहे. या कार्ड वरून आपण जगभरातील सर्व प्रकारच्या ग्राहक सेवा उपभोगू शकतो. त्याचबरोबर, आपण हे कार्ड कधीही बदलू शकाल.

2. गोल्ड कार्ड-

जर आपल्याकडे गोल्ड व्हिसा कार्ड असेल, तर आपल्याला ट्रॅव्हल असिस्टन्स, व्हिसाच्या ग्लोबल कस्टमर असिस्टन्स सुविधेचा लाभ मिळतो. हे कार्ड संपूर्ण जगभरात वापरण्यात येते . गोल्ड कार्ड जागतिक नेटवर्कशी कनेक्टेड आहे . रिटेल आणि एंटरटेन्मेंट, डायनिंग आउटलेटवर हे कार्ड स्वाइप करून आपण अनेक प्रकारच्या ऑफर मिळवू शकता.

3. प्लॅटिनम कार्ड-

या कार्डमधून आपल्याला आपले पैसे काढता येतात. ग्लोबल नेटवर्कमध्ये देखील आपण या कार्डचा वापरू शकता. या कार्डवर अनेक डील, डिस्काउंट ऑफर तसेच इतर सुविधा ग्राहकांना मिळतात.

4. टायटॅनियम कार्ड-

टायटॅनियम कार्डमधील क्रेडिट मर्यादाही प्लॅटिनम कार्डपेक्षा खूपच जास्त आहे. हे कार्ड सामान्यतः चांगला क्रेडिट स्कोअर आणि जास्त उत्पन्न असलेल्या नग्रिकानव बँकेकडून दिलं जातं.

5. सिग्नेचर कार्ड-

विमानतळ लाउंज प्रवेशासह इतर अनेक सेवासिग्नेचर सिग्नेचर कार्डमध्ये देण्यात येतात

मास्टर कार्ड –

मास्टरकार्डचेही सुमारे तीन प्रकार आहेत. World Debit MasterCard,Enhanced Debit Card. Standard Debit Card, आपण बँकेत खातं उघडलं तर आपल्याला Standard Debit Card मिळते.

RuPay Card –

Rupay Card या मध्येही तीन प्रकार आपल्याला दिसून आहेत. Classic, Platinum आणि Select Card. डेबिट आणि क्रेडिट कार्ड या तीनपैकी ग्राहकांना त्यांच्या आवश्यक असणाऱ्या गरजा तसेच उत्पन्न पाहून दिलं जातं.