उद्यापासून बँकांचे हे नियम बदलणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली :- उद्यापासून बँकांचे नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकांच्या कामाच्या वेळा, व्याजदर यात बदल झाले आहेत. या नियमांमुळे तुमच्या पैशांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी काही राज्यांमध्ये सरकारी बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ बदलणार आहे.

1. तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर 1 नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचा व्याजदर बदलणार आहे. बँकेच्या 42 कोटी ग्राहकांवर याचा परिणाम होईल. एक लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटचा व्याजदर आता 3.25 टक्के करण्यात आलाय.

2. महाराष्ट्रातल्या बँकांचं नवं वेळापत्रक ठरवण्यात आलं आहे. आता सगळ्या बँका एकाच वेळी सुरू होतील आणि एकाच वेळी बंद होतील. बँकांच्या कामाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 करण्यात आली आहे. 

3. SBI बँकेच्या कर्जाचा व्याजदर 8.05 टक्के करण्यात आला आहे. हे नवे दर 10 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर SBI ने व्याजदरात कपात केली आहे.


अहमदनगर लाईव्ह 24