सावधान! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत दिला ‘हा’ इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.

परंतु लस येईपर्यंत प्रशासनाने घालून दिलेले सुरक्षेचे नियम जर आपण पाळले तर आपली कोरोनापासून सुरक्षा होऊ शकते. परंतु राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना लोकांनी नियमांचं पालन केलं नाही आणि अशीच गर्दी वाढत राहिले तर कोरोनाची दुसरी लाट येवू शकते अशी शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

लोक आता कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. गर्दी वाढत आहे आणि नियमांचं पालन ज्या काटेकोरपणे करायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती आहे. लोकांना कठोरपणे नियमांचं पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

WHOनं तर असे म्हटले आहे की, कोरोनाचा वाढणारा हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. नाहीतर याचे परिणाम येत्या काळात अत्यंत गंभीर होतील आणि मृत्यूचा आकडा वाढेल जे धोकादायक असेल. दरम्यान, वाढते कोरोनाचे संक्रमण पाहता जगभरात लोक लस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तसे संशोधनही जगभर सुरु आहे. अद्याप रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे.

यात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील ‘सीरम इन्स्टिटयूट’ची लस लवकरच येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24