अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Weather :- अवकाळी पाऊस हजेरी लावून गेल्यानंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट आलं आहे. सोमवारी २५ एप्रिलपासून २७ एप्रिलर्यंत अहमदनगर जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे.
या काळात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. केवळ अहमदनगरच नव्हे तर मध्य भारतातच ही उष्णतेची लाट आली येत आहे.
पुढील पाच दिवस गुजरात राज्यात तसंच दक्षिण उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, बिहार, झारखंड, राजस्थान या भागात उष्णतेची लाट राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज आकाश अंशात: ढगाळ आहे. उद्या तापमानात किंचित वाढ होईल. सोमवारपासून मात्र त्यात मोठी वाढ होणार आहे.