सर सलामत तो पगडी पचास म्हणून सतर्क रहा : पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. श्रीगोंदा येथील शासकीय यंत्रणेने गार, निमगाव खलु गावची पाहणी करत या गावांमधून दौंड व अन्य ठिकाणी होणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, विक्रमसिंह पाचपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, संदिप नागवडे यांनी  या दोन्ही गावात जाऊन पाहणी करून गावकऱ्यांना विशेष सूचना देऊन त्या सर्व पाळण्याची विनंती केली.

दौंड शहरातील राज्य राखीव दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने ,दौंड शहरासह आजूबाजूचा परिसर बफर झोनमध्ये आला आहे. त्यामध्ये श्रीगोंदे तालुक्यातील निमगाव खलू आणि गार ही गावे बफर झोनमध्ये आली आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कुणीही घराबाहेर पडणार नाही, या गावामधील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. कुणीही कुठल्याही कामासाठी छुप्या मार्गाने दौंडला जाणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायची आहे.

या भागातील एखाद्या रुग्णाला अन्य ठिकाणी न्यायचे असेल तर ते दौंड ला न नेता नगर ला नेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या भागातील दूध दौंड सह पुण्याच्या काही भागात जाते. त्यावरही पूर्णतः निर्बंध आणले आहेत . याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सर सलामत तो पगडी पचास म्हणून सतर्क रहा : पाचपुते

गार, निमगाव खलू सह नदीपट्ट्यातील इतर गावांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दोन गावातील नागरिकांनी घराबाहेर पडूच नये. जीवनावश्यक वस्तू दुकानदारा मार्फत नागरिकांना पोहच होतील. याबाबत कामगार तलाठ्याना सूचना देण्यात आल्या आहेत. बाहेरच कोणी या ठिकाणी येणार नाही अन या गावातील ही कोणी इतरत्र जाणार नाही या विषयी सर्वाना सूचना दिलेल्या आहेत. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या भूमिकेतुन सर्वांनी काळजी घेतली पाहिजे : बबनराव पाचपुते (आमदार, श्रीगोंदा-नगर विधानसभा)

भीमा नदीतील बोटी काढल्या बाहेर

श्रीगोंदा व दौंड च्या मध्ये असलेल्या भीमा नदीचा लॉकडाऊन च्या काळात प्रवासासाठी सुरू होता. बोटी द्वारे काही जण दौंड ला जात असल्याची माहिती काही गावकऱ्यांनी पाचपुते व माळी यांना दिली. त्यांनी तातडीने निर्णय घेत भीमा नदीतील सर्व बोटी बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. स्वतः उभे राहून सर्व बोटी नदी बाहेर काढण्यात आल्या. तहसिलदार माळी यांनी या बोटी ताब्यात घेऊन अन्य ठिकाणी हलविल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24