महाराष्ट्र

सावधान ! बेवड्या वाहनचालकांवर पोलीस करणार कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना देण्यात आले आहे.

रविवारी रात्री जिल्ह्याभरात जिल्हा पोलिसांनी विशेष मोहिम राबवून अशा मद्यप्राशान करून वाहन चालविणार्‍या 47 वाहन चालकाविरोधात कारवाई केली आहे.

त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत कळविले आहे. याबाबतची माहिती नगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी रविवारी रात्री आठ ते 12 यावेळेत जिल्हाभर वाहन चालकांची तपासी करून मादक द्रव्याचे सेवन करणार्‍या 47 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान ही कारवाई यापुढे सुरू राहणार असून वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहने चालवू नये, असे आव्हान जिल्हा पोलिसांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office