‘हे’आमदार झाले नाराज, पोलिसांबाबत केली थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- तालुक्यातील विविध भागात पोलिस चौक्या उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले असतानाही पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला अंधारात ठेवत चौक्यांचे उद्घाटन केल्याने आमदार लहू कानडे नाराज झाले.

त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. दरम्यान, यात राजकारण न करता सहकार्य केले पाहिजे, असे माजी सभापती दीपक पटारे म्हणाले. मागील महिनाभर आमदार कानडे मुंबईत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.

त्यांच्या अनुपस्थितीत दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेव तोरणे यांच्यासह त्या त्या गावातील सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निमगाव खैरी, कारेगाव, पढेगाव, हरेगावफाटा येथे पोलिस चौक्या सुरू करण्यात आल्या.

कानडे यांनी पत्रकात म्हटले आहे, पोलिस अधिकाऱ्यांनी शासनाचे कोणतेही आदेश नसताना विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून पोलिस चौक्यांची उदघाटने केली. मी स्वतः अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले असताना लोकवर्गणी करण्याची गरज नव्हती.

मला अंधारात ठेवून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पढेगाव, कारेगाव येथील पोलिस चौक्यांची उदघाटने केली गेली. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याशी विचारविनिमय केला नाही.

विकासकामांसाठी महाविकास आघाडी सरकार सक्षम असताना लोकवर्गणी का केली? तसे अधिकार संबंधितांना आहेत का? असे सवाल कानडेंनी उपस्थित केले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24