सरकारवर टीका करण्याअगोदर बबनराव पाचपुते यांनी आत्मपरीक्षण करावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्गाने संपुर्ण जग हैराण झाले असताना आ. बबनराव पाचपुते यांनी राज्यातील सरकार निष्क्रिय असून जनतेला वार्‍यावर सोडले आहे, अशी टीका केली.

ही टीका निरर्थक असून अशी टीका करण्याअगोदर अडचणीच्या कालखंडात आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय केलं

याच आत्मपरीक्षण करावे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाने संपुर्ण जग हैराण झाले असून ही कठीण परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने परिश्रम पुर्वक हाताळत आहे.

हे सारे राज्यातील जनता पहात असून सरकारचे जनतेकडून वेळोवेळी कौतुकही झाले आहे. एवढे चांगले काम सरकार करत असताना आ.पाचपुते सरकारवर टीका करत आहेत.

खरतर ही वेळ राजकारण करण्याची नसून या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असताना यांना मात्र राजकारण सुचतंय.

आपण आपल्या साईकृपा कारखान्याचे स्पीरिट कुठे आणि कशासाठी पाठविले हे जग जाहीर आहे. हेच का तुमचे योगदान? असा सवाल करून स्वतः चं ठेवायचं झाकून दुसर्‍याच बघायच वाकून ही तुमची सवय आहे,

यापुढे जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग बंद करा व सरकारवर टीका करण्याअगोदर आ. पाचपुते यांनी स्वतः चं आत्मपरीक्षण करावे, मगच बोलाव असा इशारा शेलार यांनी दिला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज 
https://www.facebook.com/ahmednagarlive24

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर 
https://twitter.com/Ahmednagarlive

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24