सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव ;- आमदार म्हणून शपथ घेताना जबाबदारीची जाणीव मला झाली, असे आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ज्या विधानभवनात यशवंतराव चव्हाण, शंकरराव काळे, शरद पवार अशा मातब्बर नेत्यांनी शपथ घेतली, तेथे शपथ घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

विधानभवनात जाण्याची माझी पहिली वेळ नाही, पण कोपरगाव मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी विधान भवनाच्या परिसरात पाऊल ठेवले तेव्हा माझ्या खांद्यावर असलेली जबाबदारी जाणवत होती.

कोपरगावच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो आहे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी माझा आवाज येथे घुमणार आहे.

शंकरराव काळे यांच्या आदर्श विचारांवर, शरद पवार व माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रत्येक पाऊल असणार आहे.

जनता माझ्या पाठीशी नेहमी असेल याची मला खात्रीच नाही तर विश्वास आहे, असे आमदार काळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Latest News Updates

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24