केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा – मा. खा. दिलीप गांधी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदीजी यांनी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पथक पुरवठा योजनेची अंमलबजावणी केली असून या योजने अंतर्गत पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी खेळते भांडवल म्हणून रु. १०,०००/- एवढे खेळते भांडवल कर्ज रूपाने सर्व सरकारी बँकेत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या योजनेमध्ये नियमित हप्ते भरल्यास ७% व्याजात सूट मिळेल व खेळते भांडवल भरल्यास पुढच्या मोठ्या भांडवलाची हमी त्या लाभार्थ्याना मिळेल. सदर योजनेचा डिजीटल व्यवहार केल्यास रु. १२००/- पर्यंत कॅशबॅक लाभार्थ्याना मिळेल.

सदर योजना भाज्या, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भाजी-पाव, पापड, वस्त्र, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी या विक्रेत्यांचा समावेश आहे

तसेच केश कर्तनालय, चर्मकार, पानटपरी, लॉन्ड्री या व्यवसायिकांचाही समावेश प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत या योजनेत समावेश केला असून

यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो इ. आवश्यक कागदपत्रे जरुरीचे आहे. संपर्कांसाठी माझे जनसंपर्क कार्यालय, देवेंद्र बंगला,

आनंदऋषीजी मार्ग, बुरूडगाव रोड, अहमदनगर येथे संपर्क साधून या लोककल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. खा. दिलीप गांधी यांनी केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24