महाराष्ट्र

Benefits of Filing ITR : ITR भरण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? एकदा फायदे जाणून घ्या आणि मग ठरवा कर्ज…

Benefits of Filing ITR : व्यवसाय करणारे किंवा इतर लोक हे दरवर्षी ITR भरत असतात. प्रत्येक करदात्याला कर भरण्यापूर्वी त्याच्या उत्पन्नाचा हिशेब द्यावा लागतो, ज्यासाठी आयकर रिटर्न म्हणजेच आयटीआर भरावा लागतो.

अशा वेळी बर्‍याच लोकांना वाटते की आयटीआर फाइलिंग ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे आयकर विभाग तुमच्या करपात्र उत्पन्नाचा तपशील ठेवतो. मात्र याचे काम केवळ उत्पन्न आणि खर्चाची माहिती देणे नाही, तर ITR चे इतरही अनेक फायदे आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. आज आम्ही तुम्हाला ITR भरण्याचे फायदे सांगणार आहे, जेणेकरून याचा फायदा यापुढे तुम्हाला होत राहील.

रिफंड दावा

आपल्यापैकी बरेच जण PPF आणि किसान विकास पत्र यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात, ज्याचे फायदे कलम 80C अंतर्गत कर सवलतीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

यामध्ये कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, करदात्याने आयटीआर फाइल केल्यावरच ही सूट मिळेल. म्हणूनच तुम्हाला विविध गुंतवणुकीद्वारे कर सूट मिळवायची असल्यास आयटीआर भरणे आवश्यक आहे.

कर्ज मिळण्यास मदत होते

ITR दाखल करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज घेताना. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये ITR फाइल देखील समाविष्ट आहे. हे दाखल केल्याने बँकेचा तुमच्यावरील विश्वास वाढतो आणि गरजेच्या वेळी तुम्हाला कर्ज सहज मिळते.

क्रेडिट स्कोअर मजबूत होतो

आयकर रिटर्न वेळेवर भरल्याने आर्थिक व्यवहार सुधारतो, ज्यामुळे क्रेडिट स्कोअरही सुधारतो. कोणत्याही बँकेत कर्ज अर्जासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts