अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- सुशिक्षित समाजात आजही स्त्री भ्रुणहत्या होत असताना स्त्री जन्माचे स्वागताच्या जागृतीसाठी नगरच्या कलाकारांनी बेटी हा लघुपट साकारला आहे.
या लघुपटाच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर करुन मुलगी ही समाजाला प्रकाशमान करणारी पणती असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
बेटी हा लघुपट मुलीच्या जन्माचे स्वागत करणारा आहे. आज-काल वंशाच्या दिव्यासाठी मुलीचा अपमान केला जातो. तीला दुय्यम दर्जाची वागणुक दिली जाते. त्यांना गर्भातच संपविले जाते.
परंतु मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी पणती आहे. कौशल्याशिवाय रामाचा जन्म होऊ शकत नाही, जिजामाता शिवाय शिवाजी महाराजांचा जन्म होऊ शकत नाही म्हणजेच स्त्री शिवाय पुरुषाचा जन्म नाही.
म्हणून तिच्या जन्माचे स्वागत करा अशी शिकवण हा लघुपट देतो. या लघुपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते गोविंद गायकवाड यांनी केले असून, निर्मिती बि.बि. एफ यांनी केली आहे.
यामध्ये सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर यांनी डॉक्टरची भूमिका साकारली आहे. तर यामध्ये बाल कलाकार सृष्टी उदमले, अमोल कांदे, पल्लवी भालेराव या नगरच्या कलाकारांच्या भूमिका आहेत.
लघुपटाचे छायांकन सुदर्शन सोळंके यांनी केले आहे. या लघुपटासाठी डॉ. इम्रान शेख, डॉ.प्रतीक, डॉ. गायकवाड, डॉ. रेणुका काळे, इम्रान शेख, हेमलता कांबळे, अझहर शेख, दिपाली उदमले, मुस्तकीम शेख यांचे सहकार्य लाभले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved