अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-भालचंद्र नेमाडे यांची हिंदू हि कादंबरी खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेली आहे.आता या कादंबरीतील काही भागावर आक्षेप नोंदवला गेला आहे.
आक्षेप नोंदवला गेल्यानंतर हिंदू कार लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर त्यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या विरोधात फिर्याद देणाऱ्या फिर्यादीचे नाव वकील रमेश खेमू राठोड (वय ३५,रा. शांतीनगर,भोसरी) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकात लमाण महिलांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले गेले आहे.
त्यामुळे जातींमध्ये द्वेष उत्पन्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वकील राठोड यांच्या म्हंणन्यानुसार,भालचंद्र नेमाडे यांनी पुस्तकात समाजाच्या आक्षेपार्ह लिखाण केले आहे.
त्यामुळे त्यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे पुस्तक माघारी घेण्यात यावे.तसेच त्यांनी समाजचीही माफी मागावी नाहीतर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.