भास्करगिरी महाराज अयोध्येला रवाना, म्हणाले ज्या सुवर्ण क्षणाची ….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या बुधवारी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा होणार आहे. राम जन्मभूमिसाठी अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भूमिपूजन समारंभ होत आहे. 

श्रीराम जन्मभूमी आंदोलनावेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे भास्करगिरी महाराज प्रमुख होते. श्री राम जन्मभूमि अयोध्येतील अनेक आंदोलनांमध्ये भास्करगिरी महाराजांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. यासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या ट्रस्टच्या वतीने विशेष अतिथी म्हणून महाराजांना निमंत्रित करण्यात आले असून ते अयोध्येला रवाना झाले आहेत.

या प्रसंगी भास्करगिरी महाराज बोलतांना म्हणाले की, माऊली, तुकोबांच्या संत भूमीतून श्री पांडुरंग परमात्मा तथा भगवान श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद तथा सर्व सद्भक्तांच्या सश्रद्ध आदरयुक्त भावना घेऊन व पूजनीय संतांच्या वतीने श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांचे आशीर्वादासह अत्यंत विनम्र तथा सश्रद्ध अंतकरणाने आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनास संत भूमीतून देवभूमीत प्रस्थान करत आहोत.

राममंदिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणुसकीला सुरुवात होणार आहे. ज्या सुवर्ण क्षणाची गेली पाचशे वर्ष सर्व देशवासी आतुरतेने वाट पाहत होते तो सुवर्ण क्षण बुधवार दि, 5 ऑगस्ट रोजी येत आहे. देशातील पूजनीय वंदनीय संत सज्जनांच्या प्रमुख उपस्थित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होत आहे.

श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे सर्व श्रीराम भक्तांचे कारसेवकांचे आम्ही आभार तथा अभिनंदन व्यक्त करतो. तसेच या कार्यासाठी ज्या श्रीराम भक्तांनी कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे प्रति आदरभाव तथा संवेदना व्यक्त करत त्यांना यानिमित्ताने शतशत नमन करतो.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24