अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पिंपरी : पुत्रप्राप्ती आणि घरात असलेलं गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्यानं एका भोंदू बाबानं एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे.
पिंपरी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमनाथ कैलास चव्हाण ( वय ३२, रा. खेरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड ) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय पीडितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , भोंदूबाबा सोमनाथ याने पीडित महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे.
तुमच्या घराच्या एका खोलीत सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे. घरातील एका मुलीच्या जीव धोक्यात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com