अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या अवतारामुळे भारतासह सर्वच देशात धाकधूक वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 नोव्हेंबरपासून इंग्लंडहून किती प्रवासी आले, याचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूनंतर इंग्लंड-भारत विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी ब्रिटनहून भारतात अनेक प्रवासी आले आहेत.
या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्यातही असेच सर्वेक्षण सुरू असून या सर्वेक्षणात १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ह्यात अहमदनगर मधील एकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी १६ प्रवासी कोरोना बाधित आढळले असून त्यांचा तपशील खालीलप्रमाणे.
सध्या जगभारासह देशातही नव्या कोरोनाचा स्ट्रेन सापडल्याने मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू अत्यंत घातक आहे.कोरोनाचा नवा स्ट्रेन जुन्या रुपांपेक्षा अधिक घातक असल्याचं बोललं जातं.
जुन्या अवतारांच्या तुलनेत हा वेगाने पसरत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.