अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारातील ’कोहिनूर’ मधील आतापर्यंत तब्बल 9 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मागील तीन-चार दिवसांत आढळलेल्या शहरातील कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल 8 रुग्ण हे कोहिनूर या दुकानात काम करणारे कर्मचारी आहेत.
तर आणखी 1 व्यक्ती त्यांच्याशीच संबंधित आहे. सिध्दार्थनगर, सारसनगर, मुकुंदनगर, तोफखाना अशा विविध परिसरातील हे नागरिक आहेत. ही मोठी गंभीर बाब आहे.
दुकानात काम करणार्या कर्मचार्यांची, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संपूर्ण माहिती संकलित केली जाणार आहे. मागील काही दिवसांत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचाही शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, या कर्मचार्यांच्या संपर्कात आलेल्यांसह दुकानात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे कॉटँक्ट ट्रेसिंग करण्यात येत असल्याचे महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ.सतीश राजूरकर यांनी सांगितले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews