अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे.
त्यामुळे आता अर्णब गोस्वामी यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र, उच्च न्यायालयातही गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय दिला.
न्यायालयाने गोस्वामी यांची जामीनाची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. कनिष्ठ न्यायालय चार दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय घेईल, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved