अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राहाता पोलीसांनी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे,यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आज सकाळी केलेल्या आंदोलनाप्रकरणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ४० आंदोलकांवर जमावबंदीचा भंग केल्या प्रकरणी राहाता पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळी आ. राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे दुध दर वाढवून द्या व १० रूपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com