अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.
सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. त्यास धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे खडसे
यांचा राष्ट्रवादीमध्ये 17 ऑक्टोबर रोजी प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून तसंच विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही नाकारल्यानंतर खडसे नाराज होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved