बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोजमधील श्री. भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब आनंदा वरखडे यांचे करोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

वरखडे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणून लागल्यामुळे निघोज येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे त्यांना शनिवारी पारनेर येथे हालविण्यात आले.

परंतू ऑक्सिजन लेव्हल अधिक कमी झाल्यामुळे त्यांना नगर येथील शासकिय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नगर येथेही ऑक्सीजन लेव्हलमध्ये सुधारणा होउ शकली नाही.

ती 55 पर्यंत खाली आलेली होती. अखेर सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. 21 डिसेंबर 1979 ते 30 जुन 1090 असे 12 वर्षे त्यांनी पारनेर पंचायत समितीचे उपसभापतीपद भुषविले होते.

राज्य शासनाने जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिका-यांना मुदतवाढ दिल्यामुळे तत्कालीन सभापती कै. वसंतराव झावरे व वरखडे यांना 12 वर्षे या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती.

कै. झावरे यांच्या समन्वयातून वरखडे यांनी विविध विकासकामे मागी लावण्यात यश मिळविले होेेते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24