बिग ब्रेकिंग : राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर,’या ‘ दिवशी होणार मतदान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राज्यातील सुमारे चौदा हजार ग्रामपंचायतींची निवडणूका जाहीर झाल्या असून १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणारआहे,

तर २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणाची सुरवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला.

या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान,

१४ हजारांवर ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी निवडणुका होत असल्याने गावागावांतील राजकारण चांगलंच तापणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील ही दुसरी लढत ठरणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24