अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व असलेल्या आणि नुकतेच तळोजा जेलमधून बाहेर पडलेल्या गजा मारणेला पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा गावच्या परिसरात मारणेला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वीच एका खून प्रकरणात मारणेसह इतर आरोपींची पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. कुख्यात गुंड गजा मारणे हा १५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून वाहनांचा ताफा घेऊन जात होता. त्यावेळी उर्से टोलनाका येथे त्याच्या साथीदारांनी आरडाओरडा करून फटाके वाजवून ड्रोनव्दारे त्याचे चित्रिकरण करून दहशत माजविली होती.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात १६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी ३३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र गजा मारणे फरार होता पोलीस त्याचा शोध घेत होते.
मात्र पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा मारणे हा फरार झाला होता आणि तो जावळी तालुक्याच्या हद्दीमध्ये मेढा पोलिस पोलिसांना सापडला. पुणे पोलिसांना हवा असणारा गजा मारणे घटनास्थळावरून फरार झाला होता.
तो महाबळेश्वरच्या परिसरात गेल्या काही दिवसापासून फिरत असल्याची माहिती देखील समोर येत होती. मात्र आज जावळी तालुक्यातील मिळणा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली आणि मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सापळा रचत फिल्मी स्टाईलमध्ये जेरबंद केले.
गजानन मारणे हा गुंड असून त्याच्यावर खुन, गर्दी, मारामारी, खंडणी वगैरेसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. परस्परविरोधी टोळी यद्धातून अनेकांचे खून झालेले आहे. गजा मारणेप्रमाणेच त्याचा विरोधी टोळी प्रमुख बाहेर असून त्यांच्यावर दहशत बसावी व जनतेवर दहशत बसावी, जेणेकरुन त्याच्या दृष्टकृत्यास कोणी आड येणार नाही.
म्हणून त्यांचे समर्थकाकरवी जनतेच्या मनामध्ये दहशत रहावी म्हणून कट करुन युट्युब, फेसबुक, इन्स्ट्राग्रामवर अशा माध्यमातून त्यांनी नियोजनपूर्वक तळोजा कारागृह ते कोथरुड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ क्लीप व्हायरल करुन, त्यावर कमेंटपोस्ट करुन व लाईक करुन पुण्यातील नागरिकांच्या मनामध्ये दहशत बसविली होती.