बिग ब्रेकिंग : तर राज्यातील दारुची दुकानंही बंद….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात आणि देशात झपाट्याने वाढत असताना, शनिवारी काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

यामध्ये दारूच्या दुकानावर गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

याची अंमलबाजवणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. पुढे बोलताना टोपे म्हणाले की, सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत गर्दी कमी करुन दारुची दुकाने, रेस्टॉरंट यांना परवानगी देण्यात आली आहे.

त्यात यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली असून गर्दी वाढली तर सगळेच बंद करावे लागेल, तसेच शाळाही बंद ठेवण्यात आल्यात मात्र दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करतांना बघायला मिळत आहे.

त्यामुळं गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा टोपे यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत.

जोपर्यंत राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल, तर धार्मिक स्थळेही बंद करणार आणि त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल असं टोपे यांनी म्हटलंय.

राज्यात ऑक्सीजनची मागणी नगण्य वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले आहे.