बिग ब्रेकिंग : राज्यात कोरोनाचा दुसरा अवतार ?… आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा मोठा खुलासा वाचा काय म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-औरंगाबाद  ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. पण यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

महाराष्ट्रात UK च्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कुठेही नवा कोरोनाचा अवतार आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही.

पण तरीही आवश्यक ती काळजी घेणं महत्त्वाचं असून रुग्णाचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला असेल तर तुम्ही जाब विचारू शकता असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24