अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांबरोबरच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात वाढत्या लुटमारीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कठोर पावूल उचलली आहे.
यातच गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत येथे सराफ व्यावसायिकांना लुटण्याची घटना जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली होती. दरम्यान या आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान या लूटमार प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील सराफ व्यवसायिक अतुल आणि राहुल पंडित या बंधूंना 2 नोव्हेंबरला बाभुळगाव शिवारात सायंकाळी पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते.
सराफ व्यावसायिक पंडित यांच्या चारचाकी वाहनाला या लुटारूंनी आपल्या दुचाकी आडव्या लावून सुमारे 60 लाख रुपयांचे दागिने चोरांनी लुटून नेले होते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की,
यात स्थानिक आरोपींसह पुण्यातील काही आरोपींचा समावेश आहे. सराफांकडून लुटलेल्या दागिन्यांपैकी चांदी जप्त करण्यात आली आहे. ही लूट पूर्वनियोजित होती, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved