महाराष्ट्र

बिग ब्रेकिंग : महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार ?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात केली होती.

त्यानंतर अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करत आपापल्या राज्यातील जनतेला आणखी स्वस्तात इंधन उपलब्ध करुन दिले होते. पेट्रोलच्या दरात सर्वात मोठी घट कर्नाटकात झाली आहे.

कर्नाटकात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 13.35 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी, पेट्रोलच्या किंमती कमी करण्यात पुद्दुचेरी आणि मिझोरामचा क्रमांक लागतो.

या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर अनुक्रमे 12.85 रुपयांनी आणि 12.62 रुपयांनी खाली आले आहेत. त्याचवेळी, डिझेलच्या बाबतीतही कर्नाटकने सर्वाधिक कपात केली आहे, ज्यामुळे दर प्रति लिटर 19.49 रुपयांनी खाली आले आहेत.

त्यापाठोपाठ पुद्दुचेरी आणि मिझोरामचा क्रमांक लागतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही इंधन दरकपातीचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office