मागील गेल्या दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे राज्यात नेहमीच चर्चेत आहेत. त्यांच्या आगामी वाटचालीचा परिणाम राज्याच्या राजकारणावर देखील होऊ शकेल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.
दरम्यान आता २०१३ मधील एका प्रकरणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉंरट जारी करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणी मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा कोर्टात हजर राहिले होते. त्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने जरांगे पाटलांच्या विरोधातील वॉरंट रद्द करत त्यांना ५०० रुपयाचा दंड ठोठावला.
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मी न्यायालयाचा आदर करत असल्याने आज कोर्टात हजर झालो. सरकारला काय सापडत नसल्याने आता ही केस ओपन झाली की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पाटलांची घोषणा
दरम्यान यावेळी त्यांनी आणखी एक घोषणा केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे. जर तसे झाले नाही तर विधानसभा निवडणुकीत २८८ जागा आम्ही लढाऊ आणि प्रत्येक जागेवर मराठा उमेदवार उभे करू अशी घोषणाच त्यांनी यावेळी केली.
तसेच बीड बाबत बोलताना ते म्हणाले, मी जातीवादी नसल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा इतकंच मी म्हणालो होतो, कुणाला पाडा असे स्पष्ट काही म्हटलेले नव्हतो असते ते म्हणाले. ४ जूनच्या उपोषणाबाबतही ते ठाम असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान तारीख असल्याने कोर्टात आलेलो होतो, माझ्यावर काहीच आरोप नाहीत परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पाष्ट केले.