अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने अनलॉक-4 साठी नवीन गाइडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये शाळा-महाविद्यालये आणि कोचिंग सेंटरबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.
या गाइडलाइननुसार शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र 21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वीचे विद्यार्थी शिक्षणांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात. मात्र यासाठी पालकांची लेखी परवानगी असणे अनिवार्य आहे.
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. असे असताना विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत.
केंद्र सरकारने या नियमांमध्ये असे नमूद केले आहे की कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नसेल.
काय आहे नवीन मार्गदर्शक सुचनांमध्ये?
ऑनलाईन कोचिंग व टेली काउन्सलिंगसाठी शाळांमध्ये 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना बोलावले जाऊ शकते. राज्य सरकार याची परवानगी देऊ शकतात.
21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी स्वतःच्या इच्छेनुसार शाळेत जाऊ शकतील.
यासाठी त्यांना पालकांकडून लेखी परवानगी घ्यावी लागेल. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाऊ शकते. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था,
भारतीय उद्योजकता संस्था येथे देखील प्रशिक्षण सुरू केले जाऊ शकते. उच्च शिक्षण संस्था केवळ पीएचडी करणार्या संशोधन अभ्यासकांसाठीच उघडतील.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved