अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ राऊत आणि त्याची पत्नी सोनिया राऊत यांचे नातेवाईक आणि कंपनीचे संचालक तसेच व्यवस्थापकांना या गुन्ह्यात आरोपी करावे.(Fraud case)
महाराष्ट्र ठेवीदार संरक्षक कायद्यांतर्गत संबंधितांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणीकृती समितीचे अध्यक्ष सतीश खोडवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एसपींकडे केली आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमनाथ राऊत व त्याची पत्नी सोनिया यांनी बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनी सुरू करून डिजिटल वॉलेट सुरू केले होते.
गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास एक लाख रुपयास 300 ते दीड हजार रुपये दररोज कमिशन स्वरुपात बँकेच्या सुट्ट्या सोडून देण्याचे लेखी करार ( नोटरी) करून दिले होते.
त्यामुळे राज्यातील हजारो गुंतवणूकदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सोमनाथ राऊत याने आपली दोन्ही मुले सासरे अर्जुन कांबळे (रा. निपाणी निमगाव) यांच्याकडे ठेवली आहेत.
नातेवाईकांनी ही त्यांना पळून जाण्यात मदत केली. त्यांनाही आरोपी करावे. राऊत याने आतापर्यंत हजारो लोकांना फसविले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम